Wed. May 12th, 2021

… त्या वादग्रस्त ट्विटमुळे निधी चौधरी यांची तडकाफडकी बदली

मुंबई महापालिकेच्या उपायुक्त निधी चौधरी यांनी गांधी यांचा फोटो नोटावरुन काढून टाकावा अशा अशयाचे ट्विट केले होते. त्यानंतर त्यांना चौफेर टीकेला समोरे जावे लागले होते. यामुळे त्यांनी काल फेसबूक पोस्टद्वारे त्यांच्या या विधानावर सारवासारव केली. मात्र सर्वच स्तरांतून त्यांच्या या पोस्टवर नाराजी व्यक्त करण्यात आले येत आहे. या पोस्टमुळे निधी चौधरी यांची पालिकेतून तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. त्यांनी पालिकेतून मंत्रालयात हलवण्यात आलं आहे. तसेच प्रशासनाकडून त्यांना कारणे दाखवा अशी नोटीस पाठवण्यात आली आहे.

महात्मा गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त ट्विट प्रकरण भोवलं

महात्मा गांधींवर ट्विट करण निधी चौधरींना चांगलच महागात पडलं आहे.

निधी चौधरी यांची या पोस्टमुळे तडकाफडकी बदली करण्यात आलं आहे.

तसेचं चौधरी यांना प्रशासनाकडून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

पाणीपुरवठा विभागात त्यांची बदली करण्यात आली आहे.

शरद पवार यांनी चौधरींवर कारवाई करण्याची मागणी केली होती.

निधी यांच वादग्रस्त ट्विट

आपण महात्मा गांधी यांची 150 जयंती उत्साहात साजरी करत आहोत.

नोटांवरून गांधीजींचा फोटो हटविण्याची हीच वेळ आहे.

जगभरातील गांधीजींचे पुतळे हटविण्यात यावेत,

संस्था आणि रस्त्यांना देण्यात आलेली त्यांची नावं हटविण्यात यावीत.

हीच आपल्या सर्वांकडून त्यांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली असेल.

३० जानेवारी १९४८ साठी थँक्यू गोडसे!’, असं वादग्रस्त ट्विट होत.

फेसबुक पोस्टद्वारे सारवासारव

गांधीवादी विचारसरणीच्या असून महात्मा गांधींचे रोजच स्मरण करतो.

गांधीजींबाबत आपण केलेले ट्विट हे पूर्णपणे व्यंगात्मक होते. आणि या टिप्पणीचा चुकीचा अर्थ लावला गेला.

असे स्पष्टीकरण मुंबई महापालिकेच्या उपायुक्त निधी चौधरी यांनी आपल्या फेसबुक पोस्टद्वारे दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *