कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे जम्मूमध्ये आजपासून रात्रीचा कर्फ्यू

जम्मू-काश्मीरच्या जम्मू प्रांतामध्ये आजपासून रात्रीचा कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. जम्मू परिसरात कोरोना संसर्ग वाढल्यामुळे रात्रीचा कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जम्मूमध्ये आजपासून म्हणजेच १७ नोव्हेंबर रात्री १० वाजल्यापासून ते सकाळी ६ वाजेपर्यंत रात्रीची संचारबंदी लागू केली आहे.
जम्मू-काश्मीरमधील जम्मू प्रांतात कोरोना रुग्ण वाढल्यामुळे तेथे रात्रीचा कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. दरम्यान रात्रीच्या संचारबंदी संदर्भातील निर्बंधांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकीर अंशुल गर्ग यांनी दिली आहे.
‘जम्मूमध्ये संसर्गाचे प्रमाण वाढल्याने, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने १७ नोव्हेंबर पासून रात्री १०.०० ते सकाळी ६.०० वाजेपर्यंत रात्रीचा कर्फ्यू लागू केला आहे.’ असे जिल्हाधिकारी अंशुल गर्ग यांनी ट्विट करत सांगितले आहे.
जम्मूमध्ये दिवसेंदिवस कोरोना रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. तसेच जम्मूमध्ये कोरोना रुग्णांचा आकडा ३ लाखांच्या घरात पोहचला आहे. त्यामुळे जम्मूमधील वाढत्या कोरोना रुग्णांमुळे जम्मूमध्ये १७ नोव्हेंबरपासून रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे.