Tue. Aug 3rd, 2021

चिखलफेक प्रकरणात नितेश राणेंसह 18 जणांना 23 जुलैपर्यंत कोठडी

आमदार नितेश राणे यांनी उपअभियंत्यावर चिखलफेक केल्या प्रकरणी त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. यामध्ये नितेश राणेंसह 18 जणांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. नितेश राणे यांना 23 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

नेमकं प्रकरण काय ?

कणकवली येथील गडनदी पुलावर आंदोलन केल्यानंतर आमदार नितेश राणे यांनी उपअभियंत्यावर चिखलफेक केली.

तसेच उपअभियंताला बांधून ठेवले होते.

त्यामुळे आमदार नितेश राणे यांच्यासह 18 जणांना शिक्षा सुनावण्यात आली.

त्यानंतर चार दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर कणकवली न्यायालयात हजर केले.

यावेळी त्यांना 14 दिवसांची कोठडी सुनवण्यात आली असून 23 जुलैपर्यंत कोठडी असणार आहे.

नितेश राणेंना अटक

मुंबई गोवा महामार्गाची दुरावस्था झाल्यामुळे काँग्रेसचे आमदार नितेश राणे संतप्त झाले.

कणकवली मध्ये त्यांनी महामार्ग प्राधिकरणाचे उपअभियंता प्रकाश शेडेकर यांना शिव्यांची लाखोली वाहत त्यांच्या अंगावर कार्यकर्त्यांच्या मदतीने चिखल फेकला.

या प्रकरणी नितेश राणे आणि 18 कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे.

राणे यांच्या समवेत व्हिडीओ क्लिप मध्ये दिसणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांची झाडाझडती घेण्यात आली आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *