Wed. Oct 5th, 2022

राज्य मंत्रिमंडळाच्या आज बैठक पार पडली, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली असून . या बैठकींनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठ्या घोषणा केल्या आहेत. या बैठकीत शिंदे सरकार कडून नऊ मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. पेट्रोल ५ रुपयांनी स्वस्त, डिझेल ३ रुपयांनी स्वस्त अशी मोठी घोषणा शिंदे सरकार कडून करण्यात आली आहे. याच घोषणे सोबतच त्यांनी शेतकऱ्यांना देखील दिलासा दिला आहे . नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना ५०,००० अनुदान देणार असे देखील ते म्हणाले आहेत.या बैठकीत पेट्रोल-डिझेलच्या दर कपातीसोबत महाविकास आघाडी सरकारने रद्द केलेला निर्णयही बदलण्यात आला आहे. २०१८ मध्ये राज्यातील नगराध्यक्ष आणि ग्रामपंचायतीतून सरपंचाची निवड थेट जनतेतून करण्याचा निर्णय झाला होता.

परंतु राज्यात २०१९ मध्ये सत्तांतर झाल्यानंतर महाविकास आघाडी सरकारने हा निर्णय बदलला होता. पण आता शिंदे आणि फडणवीस सरकार आल्यानंतर महाविकास आघाडीने रद्द केला निर्णय पुन्हा एकदा बदला आहे. अध्यक्ष, उपाध्यक्ष कालावधी तीन महिन्यांपर्यंत वाढवणार आहे अशी ही घोषणा या बैठकीत करण्यात आली, बाजार समितीतील सर्व शेतकऱ्यांना थेट मतदानाचा अधिकार देण्यात येणार .महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम १९६३ मध्ये सुधारणा.१८ ते ५९ वर्ष नागरिकांसाठी देण्यात येणाऱ्या मोफत कोरोना बूस्टर डोसची केंद्राची योजना राज्यात प्रभावीपणे राबविणार, तसेच राज्यात “स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) २.० अभियान” राबविणार.आणीबाणीच्या कालावधीत ज्या व्यक्तींना बंदिवास सोसावा लागला, अशा व्यक्तींचा सन्मान / यथोचित गौरव करण्याची (दिनांक ३१ जुलै, २०२० रोजी बंद करण्यात आलेली ) योजना पुन्हा सुरु करणार.

मंत्रिमंडळ बैठकीत शिंदे सरकारने घेतलेले नऊ मोठे निर्णय :

१. पेट्रोल ५ रुपये, डिझेल ३ रुपये प्रति लिटर दर कमी

२. राज्यात ‘स्वच्छ महाराष्ट्र अभियान’ राबवण्यात येणार

३. केंद्र पुरस्कृत अमृत अभियान २.० राबवणार

४. नगराध्यक्षांची निवडणूक जनतेमधून घेणार

५. सरपंचाची जनतेमधून थेट निवडणूक घेणार

६. अध्यक्ष, उपाध्यक्ष कालावधी तीन महिन्यांपर्यंत वाढवणार

७. महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियम, १९६९ मधील कलम ४३ मध्ये सुधारणा

८. बाजार समितीतील सर्व शेतकऱ्यांना थेट मतदानाचा अधिकार

९. आणीबाणीच्या कालावधीत बंदिवास सोसणाऱ्या व्यक्तींचा यथोचित गौरव करण्याची योजना पुन्हा सुरु

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.