Thu. Sep 29th, 2022

एअर इंडियाचे नववे विमान बुखारेस्टहून नवी दिल्लीला रवाना

युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय रहिवाशांना ऑपरेशन गंगा अंतर्गत सुरक्षितरित्या मायदेशी आणण्यात येत आहे. आतापर्यंत २०००हून अधिक भारतीय मायदेशी परतले आहेत. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी सांगितले की, एअर इंडियाचे ९वे विमान बुखारेस्टहून नवी दिल्लीला रवाना झाले आहे.

परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी ट्विट केले की, २१८ भारतीय नागरिकांसह ९वे विमान ऑपरेशन गंगा अंतर्गत बुखारेस्टहून नवी दिल्लीला रवाना झाले आहे.

‘ऑपरेशन गंगा’ अंतर्गत आठवे विमान दिल्लीत दाखल

रशिया-युक्रेन युद्धाचा आज सहावा दिवस असून तीढा अद्याप कायम आहे. तर युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना ऑपरेशन गंगा अंतर्गत मायदेशी आणण्यात येत आहे. तसेच मंगळवारी सकाळच्या सुमारास २१६ भारतीयांसह हंगेरीतील बुडापेस्ट ते दिल्लीत आठवे विमान दाखल झाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.