Sun. May 16th, 2021

निरा डावा कालव्याचे पाणी बारामतीला देण्यास नकार, शरद पवार म्हणाले….

कालवा समितीने चाळीस टक्के पाणि लाभक्षेत्रात नसताना बेकायदेशीरपणे बारामतीला दिले होते. तो ठराव मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत उद्याच्या उद्या रद्द करायला लावणार असून बारामती आणि इंदापूरला दिले गेलेले २.२ टिएमसी पाणी फलटण सांगोला पंढरपूर या तालुक्यातील जनतेला मिळणार आहे. असे वक्तव्य माढ्याचे खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी काल जाहीर सभेत केले होते. आणि आज तात्काळ या जलसंपदा मंत्री गिरिष महाजन यांनी निरा डाव्या कालव्यातुन मिळणारे हे निरा देवधर आणि भाटघर धरणाचे पाणि बंद केल्याने भाजप सरकार पक्षपातीपणे वागत असल्याच्या भावना बारामती आणि इंदापुर तालुक्यातील शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

नेमकं प्रकरण काय ?

निरा डावा कालव्याचे अतिरिक्त पाणी बंद करून बारामती करांचे पाणी बंद करण्याचा इशारा मंत्री गिरीश महाजन यांनी दिला होता.

राजकरण करावं पण कुठं याचं भान ठेवले पाहिजे. अशी टीका राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी दिला आहे.

या प्रश्नात पडू नये, वाद वाढवू नये. ज्यावेळी संबंध महाराष्ट्रात पाण्याचे दुर्भिक्ष आहे.

अशा वेळी अशा प्रश्नाच्या बाबतीत सर्वांनी अत्यंत समंजसपणे बोलण्याची गरज आहे. असे शरद पवार म्हणाले आहेत.

वीर भाटघर धरणाच्या उजव्या कालव्याद्वारे 57 टक्के तर डाव्या कालव्याद्वारे 43 टक्के पाणी वाटपाचे धोरण होते.

बारामतीला पाणी देण्याच्या करारामध्ये शरद पवार आणि अजित पवार यांनी या करारामध्ये बदल केला आहे.

यामध्ये नीरा देवघर धरणातले 60 टक्के पाणी डाव्या कालव्यातून बारामती आणि इंदापूर तालुक्याला द्यावे.

40 टक्के पाणी फलटण, माळशिरस, सांगोला आणि पंढरपूर तालुक्याला देण्याचा निर्णय घेतला.

हा करार ३ एप्रिल २०१७ पर्यंतचा करण्यात आला होता. आता बारामतीला पाणी देण्यास नकार देण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *