Wed. Jan 19th, 2022

CSMT पूल दुर्घटनेप्रकरणी स्ट्रक्चरल ऑडिटर नीरज देसाईला अटक

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाजवळ असलेल्या हिमालय पादचारी पूल गुरुवारी कोसळल्याची घटना घडली होती. या अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला असून 39 जण जखमी झाले होते. या पूल दुर्घटनेप्रकरणी डी डी देसाई या कंपनीचा मालक ऑडिटर नीरजकुमार देसाई याला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. तसेच नीरजकुमार देसाईवर सदोष मनुष्यवधाप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे.

नेमकं प्रकरण काय ?

मुंबईतील 74 पादचारी पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे काम डी डी देसाई या कंपनीला देण्यात आले होते.

या दुर्घटनेप्रकरणी आझाद मैदान पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या गुन्ह्याच्या आधारावर नीरज देसाईला अटक केल्याचे समजते आहे.

यापूर्वी मुंबई महापालिकेने कारवाई केली.

तसेच अभियंत्यांना निलंबित करण्यात आले होते तसेच निवृत्त अभियंत्यांची चौकशी केली जाणार आहे.

ऑडिटरने  स्ट्रक्चरल ऑडिटचा चुकीचा अहवाल दिल्यामुळे देसाई कंपनीचा काळ्या यादीत समावेश करण्यात आला होता.

तसेच कंत्राटदार आरपीएस कंपनीला कारणे दाखवा अशी नोटीस पाठवण्यात आली.

नीरज देसाई यांच्यावर 304  (2) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.

या याचिकेवर 22 मार्च रोजी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *