CSMT पूल दुर्घटना; तरीही दुरुस्ती देसाईच्या ऑडिटप्रमाणेच

मुंबई महापालिकेपासून जवळचं असणारा  छत्रपती शिवाजी टर्मिनस स्थानकाजवळील हिमालय पूल 14 मार्चला ऐन गर्दीच्या वेळी कोसळला आणि 6  जणांचा मृत्यू झाला तर 31 जण जखमी झाले.या पूलाचे सदोष ऑडिट करणाऱ्या देसाई असोसिएटसचा मालक नीरव देसाई याला पोलिसांनी अटक केली. तर पालिकेने या कंपनीला काळ्या यादीत टाकले आहे.

याचं डी. डी. देसाईज असोसिएटेड इंजिनीअरिंग कन्सल्टस अँन्ड अॅनॉलिसीस्ट प्रा. लि. कंपनीने दक्षिण मुंबईतील 16 पुलांचे ऑडिट केलं आहे.या ऑडिट नूसारच इतर पुलांच्या दुरुस्तीचा प्रस्ताव स्थायी समितीत मंजुरीसाठी मांडण्यात आला आहे.त्यामुळे हा प्रस्ताव रद्द करण्याची मागणी होत आहे.

दक्षिण मुंबईच्या विविध भागातील 16 पुलांच्या दुरुस्तीचा हा प्रस्ताव असून दुरुस्तीसाठी पालिका 13 कोटी 40 लाख रुपये खर्च करणार असून जैन कन्स्ट्रक्शन या कंपनीला हे काम देण्यात आले आहे.

मुंबईत या पुलांची होणार दुरुस्ती

प्रिन्सेस स्ट्रीट पूल

चर्चगेट उत्तर भुयारी मार्ग

ग्लोरिया चर्च उड्डाणपूल

वाय ब्रिज उड्डाणपूल

ऑपेरा हाऊस पूल

फ्रेंच पूल

हाजीअली भुयारी मार्ग

फॉकलंड रोड

इस्टर्न फ्री वे

एसव्हीपी रेल्वे पूल

वाय. एम. उड्डाणपूल

पी. डिमेलो पादचारी पूल

चर्चगेट दक्षिण भुयारी मार्ग

 

 

 

 

Exit mobile version