Nirbhaya Case : निर्भयाच्या आरोपींना एकाच वेळी फाशी, ‘संर्घषाला अखेर यश’ – आशा देवी

गेल्या 7 वर्षापासून लांबणीवर असलेल्या निर्भया प्रकरणाला आज पुर्णविराम लागला आहे. निर्भया प्रकरणातील आरोपींना आज फाशी देण्यात आली आहे. यामुळे न्यायाच्या प्रतिक्षेत असलेल्या निर्भयाच्या आईला आज अखेर न्याय मिळाला आहे.

या प्रकरणातील चारही आरोपी मुकेश सिंह, विनय शर्मा, पवन गुप्ता, विनयकुमार सिंह यांना आज सकाळी 5.30 वाजता तिहार तुरूंगामध्ये फाशी देण्यात आली. या फाशीसाठी बिहारमधील बक्सर येथून दोर मागवण्यात आले होते.

याआधी 4 वेळा या आरोपींनी पळवाटा शोधल्याने त्यांची फाशी लांबणीवर गेली होती. मात्र आता निर्भयाला न्याय मिळाला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी राम सिंह याने तुरूंगातच आत्महत्या केली होती.

निर्भया प्रकरणातील आरोपींच्या फाशीसाठी मेरठ वरून पवन जल्लाद हे दिल्लीमधील तिहार तुरूंगामध्ये आले होत. या प्रकरणातील आरोपींना एकाच वेळी फाशी देण्यात आली. अशी एकाच वेळी चौघांना फाशी देण्याची ही पहिलीच वेळ आहे.

यानंतर आरोपींना फाशी मिळाल्याने निर्भयाच्या आईला दिलासा मिळाला. यामुळे त्यांनी त्यांचे मत माध्यमांसमोर व्यक्त केले.

काय म्हणाल्या आशा देवी ?

7 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर आज अखेर मला न्याय मिळाला. जो संघर्ष सुरू केला, त्या संघर्षाला आज यश मिळालं आहे. हा संघर्ष आमच्यासाठी खुपच मोठा होता.

विंलबाने का होईना पण माझ्या मुलीला न्याय मिळाला. हा आजचा देशातील मुलींच्या नावे आहे. त्यामुळे या संघर्षात मोठी भूमिका निभावणाऱ्या सरकारचे आणि न्यायालयाचे मी आभार मानते. असे मत त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

तसेच माझी मुलगी जर वाचली असती तर आज मी एका डॉक्टरची आई असती. अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

Exit mobile version