निर्भयाच्या आरोपींची तिसऱ्यांदा फाशी टळली

निर्भयाच्या आरोपींची तिसऱ्यांदा फाशी टळली आहे. निर्भयाच्या आरोप्यांना ३ मार्चला सकाळी ६ वाजता होणार होती. परंतु आता ही फाशी टळली आहे.
पुढच्या कारवाई पर्यंत या फाशीला स्थगिती मिळाली आहे. दिल्लीच्या पातियाळा न्यायालयाने हा निर्णय दिला आहे.
यामुळे आता निर्भयाच्या आरोपींची फाशी आणखी लांबली आहे.
यासंपूर्ण प्रकरणी निर्भयाच्या आईने प्रतिक्रिया दिली आहे. आरोप्यांनी फाशी द्यावीच लागेल. मी हार मानणार नाही, असं निर्भयाची आई म्हणाली.
दरम्यान १६ डिसेंबर २०१२ साली चालत्या बसमध्ये निर्भयावर बलात्कार करण्यात आला होता. या घटनेनंतर संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली होती.