Sat. Jul 2nd, 2022

निर्भया प्रकरण : चारही नराधमांना ३ मार्चला एकाच वेळी फाशी

निर्भया प्रकरणातील चारही नराधमांच्या फाशीची अंतिम तारीख अखेर ठरवण्यात आली आहे. या चारही नराधमांना ३ मार्चला एकाच वेळी फाशी देण्यात येणार आहे. या नराधमांना ३ मार्चला सकाळी ६ वाजता फाशी दिली जाणार आहे.

पातियाळा न्यायालयाने नवा फाशीनामा जाहीर केला आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून या आरोपींकडून कायद्याच्या पळवाटांचा वापर करुन फाशी लांबवण्याचा प्रकार करण्यात आला होता. याााधी २ वेळा फाशीनामा रद्द करण्यात आला होता.

दरम्यान डिसेंबर २०१२ साली धावत्या बसमध्ये निर्भयावर बलात्कार करण्यात आला होता. यानंतर संपूर्ण देशभरात मोठ्या प्रमाणावर संतापाची लाट पाहायला मिळाली होती.

निर्भयाच्या नराधमांना 1 फेब्रुवारीलाही फाशी नाहीच, दोषींच्या वकिलाचं निर्भयाच्या मातेला आव्हान

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.