Sat. Nov 27th, 2021

#NirbhayaCase : मुकेशची दया याचिका फेटाळली, फाशी कायम

निर्भया सामूहिक बलात्कार (Delhi Gangrape case) प्रकरणातील दोषी मुकेश सिंहची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली आहे. त्यामुळे आता 1 फेब्रुवारी रोजी निर्भयाच्या (Nirbhaya) गुन्हेगारांची फाशी निश्चित मानली जात आहे.

बलात्काऱ्यावर झाले लैंगिक अत्याचार?

दोषी मुकेशकडून कोणतेही पुरावे राष्ट्रपतींना सादर केले गेले नसल्याने सुप्रिम कोर्टाने याचिका फेटालली आहे. ही दयायाचिका फेटाळण्यावर कोर्टाने (Supreme Court) पुनर्विचार करावा अशी मागणी मुकेश सिंहची वकील अंजना प्रकाश यांनी केली आहे.

तुरुंगात मुकेशवर लैंगिक अत्याचार झाल्याचं तसंच त्याच्या भावाची हत्या झाल्याचं याचिकेत म्हटलं होतं.

मात्र तसे कोणतेही पुरावे किंवा कागदपत्रं सादर न झाल्याने दयायाचिका रद्द करत असल्याचं कोर्टाने म्हटलंय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *