Fri. Jan 28th, 2022

मोदी सरकार सत्तेत न आल्यास देश 50 वर्षे मागे जाईल – निर्मला सितारमण

देशात पुन्हा एकदा मोदी सरकार न आल्यास भारत देश 50 वर्षे पाठीमागे जाईल, आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये पुन्हा एकदा मोदी सरकारला स्पष्ट बहुमत मिळणे गरजेचे आहे.

असं संरक्षणमंत्री निर्मला सितारमण यांनी म्हटलं आहे.

बंगळुरू येथील थिंकर फोरमच्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

काय म्हणाल्या निर्मला सितारमण ?

भारतीय जनता पार्टीच्या सरकारने गेल्या 5 वर्षात केलेल्या कामांचे योग्य मूल्यमापन करण्यास मतदार चुकले तर ही देशाची मोठी हानी ठरेल.

मोदी सरकारने गेल्या 5 वर्षात जे काम केलं ते अतुलनीय आहे.

मोदी सरकारच्या कार्यकाळात झालेल्या विकासकामांची तुलना सर्वश्रेष्ठ अशीच करता येईल.

देशाच्या आजपर्यंतच्या इतिहासात अशी लिडरशीप देशवासियांना मिळाली नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गेल्या 5 वर्षात एकही सुट्टी न घेता काम केले आहे, असेही सितारमण यांनी म्हटलं आहे.

तसेच काँग्रेस आघाडी सरकारमध्ये आणि आताच्या भाजपाप्रणित आघाडी सरकारमध्ये मोठा फरक असून गेल्या 5 वर्षात भ्रष्टाचारचा एकही दाग मोदी सरकारवर लागला नसल्याचेही सितारमण यांनी म्हटलं आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *