Sat. Oct 1st, 2022

नितेश राणे प्रकरण : काय झाला युक्तिवाद?

भाजप आमदार नितेश राणे यांना न्यायालयीने दिलासा दिला आहे. कणकवली न्यायालयाने नितेश राणे यांना पोलीस कोठडीची मागणी फेटाळून लावली आहे. तर येत्या येत्या १८ फेब्रुवारीपर्यंत नितेश राणे यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. नितेश राणे आणि सहआरोपी राकेश परबला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

सरकारी वकीलाचा युक्तिवाद

संतोष परब हल्लाप्रकरणात अजून तपास बाकी आहे.

तपासासाठी नितेश राणेंच्या पोलीस कोठडीची गरजेची आहे.

हल्ला प्रकरणात आर्थिक व्यवहार झाले का? याची तपासणी अद्याप बाकी आहे.

नितेश राणे यांना पुण्यात नेऊन पोलिसांना तपास करायचा आहे.

नितेश यांनी संतोष परब यांचा फोटो मुख्य आरोपीला पाठवला आहे.

हल्ला करण्यापूर्वी संतोष परब यांचा फोटो सचिन सातपुतेला पाठवला  आहे.

नितेश राणे हे कबूल करायला नकार देत आहेत.

नितेश राणेंच्या वकीलाचा युक्तिवाद

नितेश राणे दोन दिवस पोलीस कोठडीत होते.

कोठडीत असतांना कोणताही तपास झाला नाही.

तपास न झाल्यामुळे पोलीस कोठडी मान्य नाही.

नितेश राणे यांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात यावे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.