Thu. Mar 4th, 2021

‘दिशा’ शब्दावरून नितेश राणेंचा आदित्य ठाकरेंवर निशाणा

NITESH RANE CRITISING ON AADITYA THAKRE

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई: “महाराष्ट्र सरकार शक्ती नावाचा नवा कायदा आणत आहे हे ऐकून मला आनंद झाला. या कायद्याचं आधीचं नाव दिशा होतं पण ते बदलून शक्ती ठेवण्यात आलं. कायद्याचं आधीचं नाव ‘दिशा’ होतं ते काय बदललं हे समजू शकतो”, असं खोचक टोला नितेश राणेंनी लगावला.


अभिनेता सुशांत सिंग राजपूत आणि त्याची पूर्वाश्रमीची मॅनेजर दिशा सालियन या दोघांच्या मृत्यूप्रकरणी भाजपा नेते नारायण राणे आणि त्यांचे सुपुत्र नितेश व निलेश राणे यांनी उद्धव ठाकरेंचे पुत्र आणि कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर विविध आरोप केले होते. दिशा सालियन मृत्यूप्रकरणात आदित्य ठाकरे यांचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहभाग असल्याचा खळबळजनक आरोपही नारायण राणे यांनी एका पत्रकार परिषदेत केला होता. त्यानंतर आता नितेश राणे यांनी ‘दिशा’ शब्दावरून आदित्य ठाकरेंवर नाव न घेता निशाणा साधल्याची चर्चा आहे.


दरम्यान, महिला आणि बालकांवरील अत्याचार रोखण्यासाठी राज्य सरकारने मृत्युदंडाची तरतूद असलेला कायदा आणला असून या नव्या कायद्याच्या मसुद्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली. या कायद्याचं नाव ‘दिशा’ वरून ‘शक्ती’ असं ठेवण्यात आलं आहे. याच मुद्द्यावरून नितेश राणे यांनी ट्विट केलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *