Mon. Aug 15th, 2022

नितेश राणे अखेर अज्ञातवासातून परतले

संतोष परब हल्ल्याप्रकरणी अज्ञातवासात असलेले भाजप आमदार नितेश राणे अखेर गुरवारी सर्वांसमोर आले आहेत. पंधरा दिवसांच्या अज्ञातवासानंतर नितेश राणे माध्यमांसमोर आले आहेत. आज सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. या निवडणुकीनंतर नितेश राणे थेट सिंधुदुर्ग जिल्हा बँकेत प्रकट झाले.

पंधरा दिवसांनंतर अज्ञातवासातून नितेश राणे माध्यमासमोर आले. यावेळी नितेश राणेंनी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी आणि अतुल काळसेकर या भाजपच्या विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले. यावेळी प्रसारमाध्यमांनी नितेश राणे यांना काही प्रश्न विचारले, मात्र आपण १७ तारखेनंतर बोलणार असल्याचे नितेश राणे यांनी म्हटले आहे.

दरम्यान, नितेश राणे यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. येत्य १७ जानेवारी रोजी नितेश राणे यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी पार पडणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.