Sat. Oct 1st, 2022

नितेश राणेंना न्यायालयीन कोठडी

संतोष परब हल्ल्याप्रकरणी भाजप आमदार नितेश राणे यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. नितेश राणे यांनी उच्च न्यायालयातील अटकपूर्व जामीन अर्जावरील याचिका मागे घेतली. तसेच नितेश राणे न्यायालयात शरण आले आहेत. त्यानंतर सुनावणीदरम्यान, न्यायालयाने त्यांनी कोठडी सुनावली आहे.

न्यायालयाने नितेश राणे यांना न्यायालयीन कोठडी सुनावल्यामुळे नितेश राणेंचा जामिनीचा अर्ज मोकळा झाला आहे. नितेश राणे आज न्यायालयासमोर शरणागती पत्कारली. न्यायालयात जात असताना नितेश राणे यांनी माध्यमांशी संवाद साधला असता ते म्हणाले, ‘मी आज उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आदर ठेवून स्वत: शरण होण्यासाठी जात आहे.’ दरम्यान, नितेश राणे यांना कोठडी सुनावल्यामुळे त्यांना जामीन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तसेच सरकारी वकील प्रदीप घरत यांनी नितेश राणे यांना पोलीस कोठडीची मागणी केली आहे. त्यामुळे यावर न्यायालयाचा निकाल काय असणार, यावर सर्वांचे लक्ष लागले आहे.

आमदार नितेश राणे यांचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयाबाहेर पोलिसांशी हुज्जत घातल्याप्रकरणी भाजपचे प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे यांच्यासह भाजपाच्या कार्यकर्त्यांवर मंगळवारी ओरोस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

2 thoughts on “नितेश राणेंना न्यायालयीन कोठडी

  1. Hands down, Apples app store wins by a mile. Its a huge selection of all sorts of apps vs a rather sad selection of a handful for Zune. Microsoft has plans, especially in the realm of games, but Im not sure Id want to bet on the future if this aspect is important to you. The iPod is a much better choice in that case. Technically, colitis disease is an inflammation of the colon.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.