Fri. May 7th, 2021

खड्ड्यांमुळे नितेश राणे संतापले; चक्क उपअभियंत्याला घातली चिखलाची आंघोळ

मुंबई गोवा महामार्गाची दुरावस्था झाल्यामुळे काँग्रेसचे आमदार नितेश राणे संतप्त झाले. कणकवली मध्ये आज त्यांनी महामार्ग प्राधिकरणाचे उपअभियंता प्रकाश शेडेकर यांना शिव्यांची लाखोली वाहत त्यांच्या अंगावर कार्यकर्त्यांच्या मदतीने चिखल फेकला.महामार्गावरच्या एका ब्रिजला शेडेकर यांना बांधण्याचा प्रयत्न ही केला गेला.

चिखलात आंघोळ घातल्यानंतर नितेश राणे यांनी अभियंत्यांना हाताला धरून महामार्गावर फिरवून रस्त्याची दुरावस्था नजरेस आणून दिली. यावेळी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या महिला कार्यकर्त्यांनी उपभियंत्याला मारहाण ही केली. उपभियंत्याला कामात लागलीच सुधारणा करण्याच्या सूचना करत आमदार नितेश राणे यांनी आपण रोज सकाळी कामाची पाहणी करणार असल्याचे सांगितले.

म्हणून नितेश राणे संतापले…

गेल्या काही दिवसात पाऊस पडल्याने मुंबई गोवा महामार्गावर खड्डे मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत.

या खड्डयांमुळे चिखल उडत असल्याने नितेश राणे आणि त्यांचे कार्यकर्ते चांगलेच संतापले.

अभियंता प्रकाश शेडेकर यांच्यावर नितेश राणे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी चिखल फेकून रोष व्यक्त केला आहे.

स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी उपअभियंता प्रकाश शेडेकर यांना गडनदीवरच्या पुलाला बांधलं आणि त्यांच्या डोक्यावर चिखलाच्या बादल्या ओतल्या.

उप अभियंत्याला खड्ड्यांच्या अवस्थेबद्दल चांगलेच खडेबोल सुनावले आहेत. यावेळी शेडेकर यांना धक्काबुक्कीही करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *