नितेश राणेंचा अटकपूर्व जामीन फेटाळला

संतोष परब हल्ल्याप्रकरणी भाजप आमदार नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्जावर आज सुनावणी पार पडली. दरम्यान मुंबई उच्च न्यायालायने नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे. त्यामुळे त्यांना कधीही अटक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच याप्रकरणी दुसरा सहकारी आरोपी मनीष दळवीच्या अटकपूर्व जामीन अर्जाला उच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे.
काय आहे प्रकरण?
१८ डिसेंबर रोजी संतोष परब यांच्यावर कणकवलीत हल्ला झाला होता. संतोष परब हे करंजे गावचे माजी सरपंच आहेत. जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे समर्थक करंजे गावचे माजी सरपंच संतोष परब यांच्यावर अज्ञात इनोव्हा कारमधून आलेल्या दोघांनी टोकदार चाकूने वार केल्याने परब जखमी झाले होते. याप्रकरणी संशयित आरोपी सचिन सातपुतेला दिल्लीतून अटक करण्यात आली आहे. सचिन सातपुते हा नितेश राणे यांच्या स्वाभिमानी संघटनेचा कार्यकर्ता असून परिणामी नितेश राणे यांची चौकशी सुरू करण्यात आली. दरम्यान या प्रकरणी नितेश राणे यांच्यावर कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
त्यामुळे याप्रकरणी जिल्हा न्यायालयात त्यांनी अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला. मात्र जिल्हा न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला. त्यानंतर त्यांनी उच्च न्यायायलयात धाव घेतली. दरम्यान आज त्यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली असून त्यांचा जामीन अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळून लावला आहे.
नितेश राणे अज्ञातवासातून परतले
पंधरा दिवसांच्या अज्ञातवासानंतर भाजप आमदार नितेश राणे माध्यमांसमोर आले. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर नितेश राणे थेट सिंधुदुर्ग जिल्हा बँकेत प्रकट झाले.
Many thanks for discussing this great content material on your website. I noticed it on google. I may check to come back if you publish much more aricles.