Tue. Sep 28th, 2021

एक्झिट पोलनंतर नितीन गडकरींनी नागपूरमध्ये घेतली बैठक

लोकसभा निवडणुकांचा निकाल 23 मे रोजी लागणार असून रविवारी शेवटच्या टप्प्यातील निवडणुकांसाठीचे मतदान झाल्यानंतर सर्व वृत्तवाहिन्यांनी एक्झिट पोल दाखवला. यामध्ये देशात पुन्हा मोदींची सत्ता येईल. असा दावा या एक्झिट पोलमध्ये करण्यात आला आहे. यानंतर राजकिय हालचालींना वेग आला आहे. यानंतर भाजपाने मोर्चे बांधणीला सुरवात केली आहे.

भाजपाच्या मोर्चेबांधणीला सुरूवात

रविवारी वृत्तवाहिन्यांनी एक्झिट पोल दाखवला यामध्ये पुन्हा मोदींची सत्ता येईल.

असा दावा करण्यात आला असल्याने राजकिय हालचालींना वेग आला आहे.

एक्झिट पोल आल्यानंतर राजकीय मोर्चे बांधणीला सुरवात झाली आहे.

नागपूरमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या घरी संघाचे सर कार्यवाहक भैयाजी जोशी,

भाजपचे नेते विजय वर्गीय आणि नितीन गडकरी यांच्या यांच्यात तब्बल दोन तास बैठक चालली.

या बैठकीमध्ये एक्झिट पोलनंतरची राजकीय स्थित आणि समीकरणावर चर्चा झाली.

भाजपला केंद्रात सरकार स्थापनेसाठीच्या पर्यायावर चर्चा या बैठकीत करण्यात आला आहे.

स्वाध्वी प्रज्ञासिंग हिने नथुराम गोडसे आणि महात्मा गांधी यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावरही चर्चा करण्यात आहे.

भैय्याजी जोशी यांनी स्वाध्वी प्रज्ञा सिंग हिला अभय देण्याचे संकेत या बैठकीत दिले आहेत.

पश्चिम बंगालच्या राजकीय परिस्थिती व तेथे झालेल्या हिंसाचार त्यांनतर देशभरात उमटलेल्या प्रतिक्रिया यावर देखील चर्चा झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *