Mon. Dec 6th, 2021

पंतप्रधान मोदींनंतर आता नितीन गडकरींची ‘मन की बात’

जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ नंतर आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीदेखील आपल्या ‘मन की बात’साठी रेडिओ हेच माध्यम निवडलं.

 

येत्या आज आकाशवाणी नागपूरच्या विविध भारतीवरून ‘गुड मॉर्निंग नागपूर’ या कार्यक्रमातून गडकरी श्रोत्यांशी संवाद साधला. नरेंद्र मोदी यांनी आपल्या ‘मन की बात’साठी रेडिओची निवड करून आकाशवाणीचा जीर्णोद्धार केला.

 

वेगवेगळ्या टीव्ही चॅनेल्समुळे राजकीय नेते आणि रेडिओचे नाते जवळपास संपले होते पण आता पुन्हा एकदा रेडिओ युग येत आहे व मोदींनंतर नितीन गडकरींनी सुद्धा रेडिओचा आधार घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *