Mon. Sep 20th, 2021

मोदी सरकारचे 100 दिवस पुर्ण, गडकरींनी दिला कामांचा रिपोर्ट

आज मोदी सरकारला 100 दिवस पुर्ण झाले आहेत. या 100 दिवसात मोदी सरकारने केलेल्या कामांचा रिपोर्ट नितीन गडकरी यांनी पत्रकार परिषद घेत दिला आहे.

आज मोदी सरकारला 100 दिवस पुर्ण झाले आहेत. या 100 दिवसात मोदी सरकारने केलेल्या कामांचा रिपोर्ट नितीन गडकरी यांनी पत्रकार परिषद घेत दिला आहे. यावेळी नितीन गडकरी, मनोज कोटक , गजानन कीर्तिकर , राहुल शेवाळे , गोपाल शेट्टी , रवींद्र नाथ मिशेल , जनरल वि के सिंह हे उपस्थित होते.

काय म्हणाले नितीन गडकरी?

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा बीजेपीला देशात यश मिळाले. तीन तलाक बाबद ऐतिहासिक एक विधेयक आणून मुस्लिम महिलांना न्याय दिला. आर्टिकल 370 रद्द केले. तिथल्या रहिवाशांना त्यांचे अधिकार मिळाले. या भागात पाकिस्तान एक प्रॉक्सी वॉर करत आहेत.60.000 करोड रुपयांचे काम जम्मू काश्मीर मध्ये केले जात आहे. ऑल सिसन रॉड बनवत आहोत. विकासाचा मार्ग यांमुळे कमी झाला आहे. मोदी दहशतवाद संपवण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

राजस्थानपर्यंत पाणी पोहचण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. राजस्थान मधील 8 जिल्ह्यात हे पाणि पोहोचणार आहे. मोटर वेहीकल कायद्यात देखील बदल करण्यात आला आहे. रोड इंजिनीरिंगवर विशेष भर दिला असून ई रजिस्टर लायसेनसिंग केले गेले 30 वर्ष जुन्या कायद्यात सरकारने बदल केला आहे. UAPA लागू करण्यात आलं.

ऑटो उद्योगात नवीन बदल आणले. बायो आणि इलेक्ट्रिक वेहीकल चालवणाऱ्यांना याचा फायदा होणार आहे. आर्थिक स्थती गंभीर असल्याने गरिबांना ऑपरेशन करणे अशक्य होते. त्यासाठी सरकारने प्रयत्न केले आहे.
7 लाख करोड ईथेनॉल उत्पादन होणार असल्याने शेतकऱ्यांना याचा निश्चीत फायदा होणार आहे. भंडारा , गोंदिया , चंद्रपूर , वर्धा डिझेल मुक्त करण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. ४०% ऐवजी ५०% एक्स्पोर्ट वाढवणार व रोजगार वाढवणार असल्याचेही ते म्हणाले आहेत. भारत क्राफ्ट हे अलिबाबा व अमेजॉन सारखे पोर्टल लवकरच खुले करणार अशी घोषणा यावेळी त्यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *