Thu. May 6th, 2021

नितीन गडकरींच्या प्रयत्नामुळे ऑक्सिजन पुरवठा होणार

राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा असल्याने बाहेरून ऑक्सिजन आणण्यासाठी सरकार प्रयत्न करीत आहे. भिलाईनंतर आता विशाखापट्टणमहूनदेखील दररोज ऑक्सिजन मिळणार आहे. त्यामुळे दररोज १५७ मेट्रिक टन ऑक्सिजन मिळणार असून त्याचा फायदा विदर्भातील रुग्णांना होणार आहे.

विशाखापट्टणम येथील आरआयएनएल प्लॅन्टमधून राज्याला दररोज ९७ मेट्रिक टन ऑक्सिजनचा पुरवठा होणार आहे. भिलाई येथील स्टील प्लॅन्टमधून दररोज ६० टन लिक्विड ऑक्सिजनचा पुरवठा होत आहे. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी यासाठी पुढाकार घेतला होता.

ऑक्सिजनची वाढती मागणी लक्षात घेता रुग्णालयांनीदेखील प्रयत्न केले पाहिजेत. ५० हून अधिक खाटांची क्षमता असलेल्या रुग्णालयांत हवेपासून ऑक्सिजन बनविणारा प्लॅन्ट उभारायला पाहिजे, असे आवाहन नितीन गडकरी यांनी केले आहे.

संपादन- सिद्धी भरत पाटील

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *