Thu. Jun 17th, 2021

‘सर्वांनी मानवतेच्या आधारे सेवा केली पाहिजे’

देशात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असताना भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी करोना विरोधातीललढ्याचं नेतृत्व नितीन गडकरींकडे सोपवलं जावं अशी मागणी केली. दरम्यान नितीन गडकरी यांनी सुब्रमण्यम स्वामींच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

‘मी काही उत्कृष्ट काम वैगेरे करत नाही. समाजात माझ्यापेक्षा जास्त योगदान देणारे अनेक लोक आहेत. आपले पोलीस कर्मचारी, सफाई कर्मचारी, डॉक्टर, कंपाउंडर, पॅरामेडिकल आणि सरकारी कर्मचारी जीवाची बाजी लावून दिवसरात्र काम करत आहेत. सामाजिक दायित्व म्हणून मी पुढाकार घेतला आहे. सध्या जात, धर्म, भाषा, पक्ष या गोष्टी मध्ये न आणता सर्वांनी मानवतेच्या आधारे सेवा केली पाहिजे’ असं नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे.

वर्ध्याच्या औद्योगिक परिसरात जेनेटिक लाईफ सायन्सेस कंपनीत रेमडिसिविर औषधाच्या उत्पादनास सुरुवात झाली आहे. गडकरी यांच्या माध्यमातून या औषधाच्या उत्पादनास मान्यता मिळाली असून अतिशय कमी वेळात केंद्र सरकारची परवानगी मिळवणारी ही पहिली कंपनी ठरली आहे. येथे दररोज तीस हजार कुप्यांची निर्मिती होईल. गरजू गरिबांना शासकीय दराने हे औषध उपलब्ध होईल, अशी ग्वाही यावेळी गडकरी यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *