Thu. Jun 17th, 2021

म्युकरमायकोसिसच्या संकटातूनही मार्ग निघाला

वर्धा: देशात कोरोनाचं संकट असताना म्युकरमायकोसिसचं संकटदेखील उभं राहीलं आहे. म्युकरमायकोसिसच्या रुग्णांचा आकडा दिवसागणिक वाढत असून या आजारावरील औषधं उपलब्ध होत असल्यानं समस्या वाढत आहेत. या परिस्थितीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या प्रयत्नानं वर्ध्यात म्युकर मायकोसिसवरील इंजेक्शनची निर्मिती होणार आहे. महाराष्ट्र, गुजरातसह अनेक राज्यांमध्ये सध्या म्युकर मायकोसिसच्या रुग्णांची संख्या वाढत आहे.

वर्ध्यातील जेनेटिक लाईफ सायन्सेस कंपनी म्युकर मायकोसिसवरील एम्फोटेरीसीन बी इंजेक्शन तयार करणार आहे. या कंपनीला राज्याच्या एफडीएनं परवानगी दिली आहे. पुढील १५ दिवसांत कंपनी इंजेक्शनचं उत्पादन सुरू करेल. यामध्ये नितीन गडकरींनी मोलाची भूमिका बजावली आहे.

‘एम्फोटेरीसीन बीचं एक इंजेक्शन ७ हजार रुपयांना मिळतं. एका रुग्णाला ४० ते ५० इंजेक्शन्स दिली जात आहेत. त्यामुळे लोकांना ही इंजेक्शन्स सहज उपलब्ध होत नाहीत. वर्ध्यात तयार होणारं इंजेक्शन १२०० रुपयांत मिळेल. एका दिवसात २० हजार इंजेक्शनची निर्मिती करण्यात येईल,’ अशी माहिती नितीन गडकरींच्या कार्यालयानं ट्विटरवरून दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *