Mon. Dec 6th, 2021

नितीन गडकरी यांची आपल्या शालेय मित्रांसोबत हुरडा पार्टी

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. तसेच नितीन गडकरी यांचा स्वभाव आणि मित्रत्व जपण्याची खास शैलीही अनेकांना माहिती आहे.

ही मैत्री जपण्यासाठी रविवारी नागपुरात हुरडा पार्टी आयोजन करण्यात आले होते.

नितीन गडकरी हे नागपूरच्या धनवटे नगर विद्यालयाच्या 1973 बॅचचे विद्यार्थी आहेत. याच 73 च्या बॅचच्या जुन्या सहकाऱ्यांनी नागपूर जवळच्या बेसा गावात हुरडा पार्टीचा बेत आखला होता.

या हुरडा पार्टीला केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी त्यांच्या व्यस्त कार्यक्रमातून हजेरी लावली. विद्यालयातील जुने मित्र आणि शिक्षकांसह केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी यावेळी हुरड्यावर ताव मारला.

तसेच विद्यालयीन आठवणींना उजाळा दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *