मनसेचे नितीन नांदगावकर यांचा शिवसेनेत प्रवेश
महाराष्ट्र नवनिर्माण वहतूक सेनेने ऐन इलेक्शनच्या तोंडावर नितीन नांदगावकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण वहतूक सेनेने ऐन इलेक्शनच्या तोंडावर नितीन नांदगावकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधून त्यांनी पक्षप्रवेश केला आहे. निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याने मनसेला धक्का बसल्याचे म्हटलं जात आहे.
मनसेचे नितीन नांदगावकर त्यांच्या आंदोलनामुळे नेहमी चर्चेत आले आहेत. खळ्ळ खट्याक स्टाईलमुळे त्यांच्या नावाची चर्चा नेहमी होत असते. त्यांचे काम इथून पुढे शिवसेनेच्या माध्यमातून चालू ठेवणार असल्याचे त्यांनी पक्ष प्रवेश करत असताना म्हटलं आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी मनसेच्या दोन याद्या जाहूीर केल्या आहेत. यामध्ये नितीन नांदगावकर यांच नाव वगळळण्यात आलं आहे. याच कारणास्तव त्यांनी मनसेला राजीनामा दिल्याचं बोलल जात आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीची मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
नितीन नांदगावकर यांनी आपल्या दरबाराच्या माध्यामातून त्यांनी अनेक लोकांना न्याय मिळवून दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या जेष्ठ नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांना दादर रेल्वे स्थानकावर झालेल्या त्रासावरही त्यांनी बंड पुकारला होता.