नितीशकुमारांची आज अग्निपरीक्षा; बिहार विधानसभेत सिद्ध करावं लागणार बहुमत
वृत्तसंस्था, नवी दिल्ली
बिहारमधील नाट्यमय घडामोडीनंतर नितीश कुमार पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आहेत.
मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर नितीश कुमारांची अग्निपरीक्षा आहे. त्यांना विधीमंडळात बहुमत सिद्ध करावं लागणार आहे.
नितीश कुमारांनी आधीच 132 आमदारांच्या समर्थनाचं पत्र राज्यापालांना दिले. मात्र, विधानसभेत नेमकं काय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तर, दुसरीकडे
राजदचे आमदार नेमकी भूमिका काय असणार याकडेही सर्वाचं लक्ष लागून राहिले आहे.