Thu. Jun 17th, 2021

नीतीश भारद्वाज यांनी सारा-सुशांत संदर्भात केला खुलासा…

बॉलिवूड स्टार सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर त्याच्यावर ड्रग्ज सेवनाचे आरोप करण्यात आले. सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीने एनसीबीला दिलेल्या जबाबात केदारनाथच्या सेटवर सुशांत आणि सारा अली खान हे ड्रग्ज सेवन करत असल्याचा खुलासा केल्यानंतर केदारनाथ चित्रपटात सुशांत सोबत काम करणारे अभिनेते नीतीश भारद्वाज यांनी पुढे येत प्रतिक्रिया दिली आहे. अभिनेते नीतीश भारद्वाज यांनी एका माध्यमाशी बोलताना काही गोष्टी शेअर केल्या आहे, नीतीश भारद्वाज यांना प्रश्न केल्या गेला की, केदारनाथ चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान सुशांतला ड्रग्ज सेवनाची सवय लागली होती का? यावर प्रतिक्रिया देत नीतीश भारद्वाज म्हणाले, “एक दिवस पुजा गौर मला टीव्ही इंडस्ट्रीत होत असलेल्या बदलांबाबत सांगत होती. त्याच वेळी ड्रग्सचा विषय आला होता. त्यावेळी साराने तिला सुद्धा फिल्म इंडस्ट्रीत सुरू असलेल्या ड्रग्स सेवनाबद्दल माहिती असल्याचं सांगितलं होतं. मला आजही आठवतंय, त्यावेळी मी साराला ड्रग्जपासून दूर राहण्याचा सल्ला दिला होता. कारण साराचं भविष्य उज्ज्वल आहे.” त्यावेळी साराने नीतीश भारद्वाज यांना विश्वास दिला होता. “मी कधीच ड्रग्जला हात देखील लावला नाही आणि यापुढेही ड्रग्जपासून दूरच राहणार”, असं साराने त्यावेळी सांगितलं होतं. सुशांत त्यावेळी सिगारेट ओढत होता, असं नीतीश भारद्वाज यांनी सांगितलं. तो चंचल बुद्धीचा व्यक्ती होता. ड्रग्ज घेणाऱ्या व्यक्तीची अशी बुद्धी नसते. जर तो ड्रग्ज घेत असता तर तो इतका हुशार नसता, असं देखील नीतीश भारद्वाज यांनी सांगितलं. यापुढे आणखी माहिती देताना नीतीश भारद्वाज म्हणाले, “मी सिगारेट ओढत नाही, तसंच ड्रग्ज किंवा तंबाखूने भरलेली सिगारेट कधी घेत नाही. पण मला हे माहितेय की जेव्हा ड्रग्जची सिगारेट ओढतो तेव्हा एक वेगळा वास सुटतो. मी त्यावेळी सारा आणि सुशांतला कधी नशेत किंवा कोणत्या ट्रीपवर गेलेले नाही पाहिलं. ते खूपच नॉर्मल राहत होते.” असं नीतीश भारद्वाज यांनी या दरम्यान सांगितलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *