Fri. Sep 30th, 2022

नितीश कुमार आठव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रीपदी

जेडीयूचे नेते नितीश कुमार यांनी आठव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. राज्यपाल फागू चौहान यांनी त्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. त्यांच्यासोबतच आरजेडीचे नेते तेजस्वी यादव यांनीही उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. तेजस्वी यादव हे दुसऱ्यांदा बिहारचे उपमुख्यमंत्री बनले आहेत. राजभवनात झालेल्या छोटेखानी समारंभात नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांनी पद आणि गोपनियतेची शपथ घेतली आहे. शपथविधीनंतर तेजस्वी यादव यांनी नितीश कुमार यांच्या पाया पडून त्यांचे दर्शन घेतले. गेल्या २२ वर्षात नितीश कुमार हे आठव्यांदा बिहारचे मुख्यमंत्री बनले आहेत. २०००मध्ये ते पहिल्यांदा मुख्यमंत्री बनले होते. त्यावेळी ते अवघे सात दिवसच मुख्यमंत्रीपदावर विराजमान झाले होते. मात्र, त्यानंतर त्यांनी नंतर कधी मागे वळून पाहिलं नाही.

शपथविधी सोहळ्यासाठी लालू प्रसाद यादव यांचं संपूर्ण कुटुंब राजभवनात उपस्थित होतं. त्यात राबडी देवी, तेज प्रताप यादव आणि तेजस्वी यादव यांच्या पत्नी राहेल यादव यांचा समावेश आहे. अन्य कोणत्याही पक्षाच्या किंवा राज्यातील बड्या नेत्यांना या कार्यक्रमाला आमंत्रित करण्यात आलेलं नव्हतं. तसेच, लालू प्रसाद यादव मात्र या शपथविधी सोहळ्यासाठी अनुपस्थित होते. त्यांच्यावर सध्या दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दरम्यान, शपथविधीनंतर माध्यमांशी बोलताना CM नितीश कुमार म्हणाले, भाजप सोडण्याचा निर्णय पक्षानं एकत्रितपणे घेतला. सन २०२४ पर्यंत पदावर राहिल किंवा नाही हे सांगू शकत नाही. त्यांना काय बोलायचंय ते बोलू शकतात. पण मी सन २०१४ मध्येच अद्याप राहू शकत नाही. तर, उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्या कुटुंबियांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. तेजस्वी यादव म्हणाले, बिहार माझं कुटुंब आहे. मी सर्वांचे आभार मानते असं तेजस्वी यांच्या पत्नीनं म्हटलं तर बिहारसाठी ही चांगली गोष्ट घडली. मी सर्वांचे आभार मानते असं तेजस्वी यांच्या आई राबडी देवी यांनी म्हटलं आहे. आम्ही काम करण्यासाठी सत्तेत आलो आहोत असं तेज प्रताप यादव यांनी म्हटलं आहे.

2 thoughts on “नितीश कुमार आठव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रीपदी

 1. You can’t hold with the hare and run with the hounds Link to proverb.
  https://spirifij375.net
  Life’s not all beer and skittles Link to proverb.
  Those who sleep with dogs will rise with fleas.
  A chain is only as strong as its weakest link Link to proverb.
  Thing of beauty is a joy forever – A.
  Nothing ventured, nothing gained.
  Fair exchange is no robbery Link to proverb.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.