नितीश कुमार घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ
वृत्तसंस्था, पाटणा
बिहारमध्ये राजकीय भूकंप घडविणारे मुख्यमंत्री नितीशकुमार 24 तासांच्या आत भाजपाच्या सहकार्याने पुन्हा मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार आहेत.
नितीशकुमार यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर बिहारी नाट्याला झालेली सुरुवात आज पहाटे तीन वाजेपर्यंत सुरु होती. रात्री उशीरा नितीशकुमार आणि सुशील मोदी यांनी राजभवनात जाऊन राज्यपालांची भेट घेतली.
तेजस्वी यादव यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपप्रकरणी आपल्या मनासारखे होत नाही हे पाहून नीतीश कुमार यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि महाआघाडी तोडून टाकली.