Wed. Aug 4th, 2021

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी दिला राजीनामा

वृत्तसंस्था, बिहार

बिहारच्या राजकारणात मोठा भूकंप झाला आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राजीनामा दिला. नितीश कुमार यांनी राज्यपालांकडे आपला राजीनामा सुपूर्द केला आहे. 

बिहार सरकारच्या सत्ताधारी आघाडीतील संघर्ष आता शिगेला पोहोचला आहे. भ्रष्टाचाराच्या आरोपानंतर उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी राजीनामा द्यावा आणि स्पष्टीकरण द्यावं अशी नितीश कुमारांची इच्छा होती.

मात्र, तेजस्वीचा राजीनामा घेण्यास राजद अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांनी आडकाठी केल्यानंतर नितीश नाराज झाले होते. तेजस्वी यादव यांचा राजीनामा घेण्यात ते अपयशी ठरत असल्याचं लक्षात आल्यानंतर त्यांनी राजीनामा दिल्याचं बोललं जात आहे.

  

बुधवारी संध्याकाळी पाटणामध्ये नितीश कुमारांनी जदयूच्या आमदारांची, खासदारांची आणि इतर नेत्यांची बैठक बोलावली होती. बैठकीनंतर नितीश राज्यपालांना भेटायला गेले. राज्यपालांना भेटून त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. 

दरम्यान, सीबीआयने भ्रष्टाचाराच्या आरोपावरून तीन आठवड्यांपूर्वी पाटण्यात राजदचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव व त्यांचे पुत्र तेजस्वी यादव यांच्या निवासस्थानांवर छापे मारले होते. नितीश कुमार हे कोणत्याही स्थितीत आपली व आपल्या सरकारची प्रतिमा मलिन होऊ देण्यास तयार नव्हते. 

LIVE UPDATES:

भाजपचा नितीश कुमार यांना पाठिंबा जाहीर

बिहारमध्ये मध्यावधी निवडणुका नको, भाजपकडून त्रिसदस्यीय समितीची नेमणूक

नितीश कुमार यांच्यावर हत्येचा आरोप- लालू प्रसाद यादव

नितीश कुमारांचा राजीनामा पुर्वनियोजित- लालू प्रसाद यादव

नितीश कुमार यांच्या राजीनाम्यानंतर लालू प्रसाद यादव यांची पत्रकार परिषद

नितीश कुमार यांच्या राजीनाम्यानंतर भाजपच्या मंत्रिमंडळाची बैठक,

बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित

पंतप्रधान मोदींनी ट्विट करून केलं अभिनंदन

नितीश कुमार यांची राजीनाम्यानंतर प्रतिक्रीया-

सध्याच्या वातावरणात काम करणं शक्य नाही- नितीश कुमार
आम्ही आमची बाजू स्पष्ट केली होती, हे संकट स्वत: हून ओढावून घेतलेलं होतं- नितीश कुमार
विकास कामं करताना अडचणी येत होत्या- नितीश कुमार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *