Sun. Jun 7th, 2020

नितीश कुमार यांनी बिहारमधील 11 कोटी जनतेचा विश्वास गमावला- शरद यादव यांची सडकून टीका

वृत्तसंस्था, बिहार

जदयुचे ज्येष्ठ नेते शरद यादव यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यावर सडकून टीका केली. नितीश यांनी भाजपसोबत हातमिळवणी केल्यामुळे त्यांनी बिहारच्या 11 कोटी जनतेचा विश्वास गमावला आहे अशी टीका शरद यादव यांनी केली.

 

नितीशकुमार यांनी महाआघाडीपासून फारकत घेऊन खूप मोठी चूक केली त्यांचा हा निर्णय अत्यंत विश्वासघातकी आहे असंही त्यांनी म्हटलं. शरद यादव आता बिहारमधल्या 7 जिल्ह्यांच्या दौऱ्यात लोकांसोबत संवाद साधणार आहेत. तसेच आता मी रस्त्यावर येऊन लढणार असा इशाराही त्यांनी नितीश कुमार यांना दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *