Fri. Sep 30th, 2022

नितीश कुमार यांचा राजीनामा

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी अखेर राजीनामा दिलाय. बिहारमध्ये 5 वर्षानंतर नितीश कुमार यांचा पक्ष जेडीयू आणि भाजप यांच्यातील युती पुन्हा तुटली आहे. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जेडीयू खासदार आणि आमदारांच्या बैठकीत ही घोषणा करण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जेडीयूच्या बैठकीत नितीश कुमार म्हणाले की भाजपने नेहमीच आम्हाला कमकुवत करण्याचा प्रयत्न केला. भाजपने माझा अपमान केला. 2013 पासून आतापर्यंत भाजपने फसवणूक केली आहे, अशा आरोप त्यांनी केला आहे. राजद, काँग्रेस आणि डाव्या पक्षांनी नितीश सरकारला पाठिंबा देण्यासाठी पत्र तयार केले आहे. दरम्यान, नितीश कुमार हे महाआघाडीचे मुख्यमंत्री असतील, असे काँग्रेसचे आमदार शकील अहमद खान यांनी म्हटले आहे.

राजभवनाबाहेर पत्रकारांशी बोलताना नितीश कुमार म्हणाले की सर्व आमदार आणि खासदारांनी एकमताने एनडीए आघाडीतून बाहेर पडण्याचं ठरवलेलं, त्यानंतर मी राजीनामा दिला आहे. राज्यातील नव्या सरकारमध्ये जेडीयूचा मुख्यमंत्री असेल, तर उपमुख्यमंत्री राजदचा असेल. त्याच्याकडे गृहखाते देखील असेल. विधानसभेचे अध्यक्ष काँग्रेसचा असेल. काँग्रेसचा एक उपमुख्यमंत्री देखील असण्याची शक्यता आहे. पक्षाचे खासदारकुशवाहा यांनी दुपारी अडीचच्या सुमारास एक ट्विट केले. ज्यात त्यांनी नितीश कुमार यांना पुढे जा. देश तुमची वाट पाहतोय असे म्हटले होते.

1 thought on “नितीश कुमार यांचा राजीनामा

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.