Mon. Sep 27th, 2021

धावत्या बसचे चाक अचानक निखळले अन्…

धावत्या बसचे चाक अचानक निखळल्यानंतरही बस शंभर फूट धावल्याचा प्रकार कल्याण – बेलापूर मार्गावर घडला.

चालकाने प्रसंगावधान राखल्याने बसमधील २५ प्रवाशांचे प्राण वाचले. नवी मुंबई परिवहन विभागाची ही बस आहे. सोमवारी सकाळी साडे आठ वाजता कल्याणहून – बेलापूर स्थानकाच्या दिशेने एनएमएमटीची बस निघाली होती.

नवी मुंबई हद्दीतील नारायण फाट्याजवळ बाळेगाव कॅम्पजवळ बस आल्यानंतर अचानक बसचे पुढील चाक निसटले. चालक प्रवीण मोरे बस चालवत होते. बसमध्ये २५ प्रवासी होते.

चाक निखळल्यानंतरही बस शंभर फूट तशीच पुढे गेली. यावेळी प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला. मात्र याही स्थितीत प्रवीण मोरे यांनी प्रसंगावधान राखत भरधाव बस नियंत्रणात आणली आणि विसावा हॉटेलजवळ रस्त्याच्या बाजूला बस थांबवली.

यामुळे २५ प्रवाशांचे प्राण वाचले आहेत. चालकाच्या या प्रसंगावधानामुळे त्याचे कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *