Thu. Aug 5th, 2021

‘आमचा फुटबॉल होऊ देणार नाही’, प्रकाश आंबेडकर यांचा काँग्रेसवर हल्लाबोल

काँग्रेसला युतीसाठी प्रस्ताव दिला होता, मात्र त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे आता आम्ही स्वतः काँग्रेसशी युती करणार नाही, असं वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलंय.

काँग्रेसच्या वागण्यात काही फरक पडलेला नाही.

काँग्रेस अजून लोकसभा निवडणुकीप्रमाणेच वागतेय.

आम्ही काँग्रेसचे प्रदेशध्यक्ष बाळासाहेब थोरात तसंच माणिकराव ठाकरे, अशोक चव्हाण यांच्याशी बैठक झाली.

केंद्रातील काँग्रेस नेत्यांशी बैठक होऊनही त्यांच्याकडून काही प्रतिसाद आलेला नाही.

त्यामुळे आता काँग्रेससोबत युती होणार नाही.

आता आमचा फुटबॉल होऊ नये म्हणून आम्ही गणेश विसर्जनानंतर आमच्या उमेदवारांची यादी जाहीर करणार आहोत.

MIMशी वंचित बहुजन आघाडीची युती कायम असणार आहे. आम्ही शेवटपर्यंत युतीचा प्रयत्न करत राहू.

सरकारचं दुष्काळाकडे पूर्णतः दुर्लक्ष झालंय. भाजपला वंचित बहुजन आघाडीची भीती वाटतेय.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *