महाविकासआघाडीत नाराजी नाही- बाळासाहेब थोरात

महाविकासआघाडीत कोणत्याही प्रकारची नाराजी नसल्याचं काँग्रेसचे प्रदेक्षाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केलं आहे. या संदर्भातील माहिती त्यांनी ट्विटद्वारे दिली आहे. बाळासाहेब थोरात यांनी यासंदर्भात एक व्हिडियो ट्विट केला आहे.
काय म्हणाले थोरात ?
महाविकासआघाडीत नाराजी नाही. मंत्री अशोक चव्हाण यांच्या विधानाचा विपर्यास केला गेलं असल्याचं थोरात म्हणाले. महाविकास आघाडीचं सरकार हे किमान समान कार्यक्रमावर चालणार असल्याचं ही थोरात म्हणाले.
अशोक चव्हाण काय म्हणाले होते ?
घटनाबाह्य काम करणार नसल्याचं शिवसेनेकडून लिहून घेतलं आहे. शिवसेनेने उद्देशिकेबाहेर काम केल्यास आम्ही सरकारमधून बाहेर पडू, असे अशोक चव्हाण म्हणाले होते.
सोनिया गांधी यांचा तीन पक्षाच्या सरकारला विरोध होता. पण आम्ही त्यांची मनधरणी केलं असल्याचंही चव्हाण म्हणाले. ते नांदेडमध्ये प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने कार्यक्रम आयोजित करण्यात आलं होतं. त्यावेळी ते बोलत होते.
उद्धव ठाकरे यांनी घटनेच्या बाहेर जाणार नाहीत. असं उद्धव ठाकरे यांनी लिहून दिलं. यानंतरच हे सरकार स्थापन झालं असल्याचंही अशोक चव्हाण म्हणाले होते.
दरम्यान अशोक चव्हाण यांच हे विधान मंत्री एकनाथ शिंदे यांनी फेटाळून लावलं.शिवसेनेनं अशोक चव्हाण यांनी सांगितल्यानुसार काहीच लिहून दिलं नसल्याचं एकनाथ शिंदे म्हणाले.