Tue. Sep 28th, 2021

‘आनंद दिघेंच्या घातपाताचा आरोप खोटा’, नारायण राणे यांचा मुलाला घरचा आहेर!

शिवसेनेचे दिवंगत ज्येष्ठ नेते आनंद दिघे यांच्या मृत्यूबाबत नीलेश राणे यांनी खळबळजनक आरोप केले होते. मात्र त्यावर शिवसेनेकडून प्रतिक्रिया येण्याऐवजी नीलेश राणे यांचे वडील नारायण राणे यांनीच प्रतिक्रिया देऊन नीलेश यांना घरचा आहेर दिला आहे. आनंद दिघे यांच्या मृत्यूमागे कोणताही घातपात नसून तो विषय आता मिटला आहे, असं म्हणत नारायण राणे यांनी वादावर पडदा घालण्याचा प्रयत्न केलाय.

काय म्हणाले नारायण राणे?

दिवंगत आनंद दिघे यांच्या मृत्यूबाबत जे काही आरोप झाले, ते मला मान्य नाहीत.

त्यांचा मृत्यू घातपातामुळे झालेला नाही, हे मला ठाऊक आहे.

त्यामुळे हा विषय आता मिटलेला आहे.

यापुढे या गोष्टी बोलल्या जाणार नाहीत.

यासंदर्भात मी नीलेशला सांगेन.

आनंद दिघेंना शेवटचा भेटणारा मी होतो.

मी गेलो तेव्हा दिघे यांची प्रकृती अत्यंत खालावली होती.

मी बाहेर पडून बाळासाहेबांना फोन केला.

डॉ. नितू मांडके यांना पाठवून देण्याची त्यांना विनंती केली.

बाळासाहेबांनी तशी सोयसुद्धा केली.

पण डॉ. नितू मांडके येण्याआधीच दिघे यांचा मृत्यू झाला होता.

ही सत्यस्थिती आहे.

त्यामुळे बाळासाहेबांवर नीलेशकडून आधी जे आरोप झाले, त्याच्याशी मी सहमत नाही.

 

निलेश राणे यांचं वादग्रस्त वक्तव्य

आनंद दिघे यांच्या हत्येचा कट पूर्वनियोजित होता.

मात्र बाळासाहेब ठाकरेंनी त्यांचा मृत्यू हॉस्पिटलमध्ये झाला असे भासवले.

त्यावेळी कर्जतच्या फार्म हाऊसवरही बाळासाहेबांच्या सांगण्यावरून दोन शिवसेनेच्या नेत्यांनी हत्येचा कट रचला.

ही गोष्ट ज्या दोन नगरसेवकांना मान्य झाली नाही, त्यांनाही ठार मारण्यात आलं आणि त्यानंतर ही केस दाबली गेली, असा सनसनाटी आरोप नीलेश राणे यांनी केला होता.

मात्र आता त्यांच्या वडिलांनीच त्यांच्या आरोपांचं खंडन करत बाळासाहेबांचा आनंद दिघेंच्या मृत्यूशी काही संबंध नसल्याचा निर्वाळा दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *