Jaimaharashtra news

राज्यात सध्या कोणतेही निर्बंध लागणार नाहीत

राज्यात सध्या कोणतेही निर्बंध लागणार नसल्याचं स्पष्टीकरण राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. राज्यात डेल्टा व्हेरियएंटनं शिरकाव केल्यानंतर आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहेत अशी माहिती टोपेयानें दिली आहे. राज्यभरात डोल्टाचे २१ रुग्ण असून त्यापैकी आज एका ८० वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती टोपे यांनी दिली आहे. या व्यक्तीला इतरही काही आजार होते अशी माहिती मिळत आहे. डेल्टासाठी प्रत्येक जिल्ह्यातून शंभर सॅम्पल प्रत्येक महिन्याला मागवण्यात येत आहेत आणि त्यातून डेल्टा प्लस रुग्णांचा शोध घेतला जात आहे.

राज्यात सध्या डेल्टा प्लस व्हेरिएंटचे रत्नागिरीत ९, जळगावात ७, मुंबईत २ आणि पालघर, ठाणे आणि सिंधुदुर्गात प्रत्येकी १ रुग्ण आहे. प्रथम डेल्टा होता. मात्र नंतर डेल्टा प्लस आला. डेल्टाने त्याचे रुप बदलले आहे का, याचा आता बारकाईने अभ्यास सुरू झाला असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे. सध्या डेल्टा व्हेरियंटची कमी संख्या आहे. त्यामुळं राज्यात सध्या तरी कोणतेही निर्बंध लागणार नसल्याचं टोपे यांनी स्पष्ट केलं आहे.

Exit mobile version