Jaimaharashtra news

मुंबईत लसीकरणाला पुन्हा ब्रेक

मुंबई : कोविड-१९ प्रतिबंध लसीकरण मोहिमेतंर्गत पुरेसा लससाठा उपलब्ध नसल्यामुळे बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील शासकीय आणि महानगरपालिका लसीकरण केंद्रांवर बुधवार २१ जुलै लसीकरण बंद राहणार आहे. लशींचा साठा ज्या प्रमाणात प्राप्त होईल, त्या अनुरूप योग्य निर्णय घेवून मुंबईकर नागरिकांना सातत्याने अवगत करण्यात येते. लस साठा उपलब्ध झाल्यानंतर लसीकरण पुन्हा सुरू करण्यात येईल.
मुंबईकर नागरिकांनी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाला सहकार्य करावे, असे विनम्र आवाहन महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे. लशींचा पुरेसा पुरवठा होत नसल्याने सातत्याने महापालिका प्रशासनाला लसीकरण बंद ठेवावे लागत आहे.

Exit mobile version