Sat. Sep 21st, 2019

मृत्यूनंतरही मरणयातना, ‘अशी’ न्यावी लागतेय अंत्ययात्रा!

0Shares

भाजप सरकारच्या प्रतिनिधींनी दत्तक घेतलेल्या मलकापूर तालुक्यातील उमाळी गावात मरणानंतरही मृतदेह मरणयातना भोगत असल्याची भयावह परिस्थिती पाहावयास मिळाली. या गावात मृतकाची अंत्ययात्रा चक्क पाण्यातून मार्ग काढत न्यावी लागली. या गोष्टीमुळे ग्रामस्थांकडून तीव्र संताप व्यक्त होतोय आणि लोकप्रतिनिधींच्या कार्यक्षमतेबद्दल नाराजी व्यक्त होतेय.

स्वातंत्र्याच्या 73 वर्षांनंतरही विकासापासून वंचित असलेल्या उमाळी गावात धड रस्ता नाही, नाले नाहीत. एवढंच नव्हे तर या गावात स्माशानभूमीसुद्धा नाही. पावसाळ्याच्या दरम्यान अंत्यविधी हा उघड्यावरच पार पाडावा लागतो. त्यामुळे जिवंतपणी यातना तर आहेच मेल्यानंतर ही मृतदेहाची अवहेलना होत असल्याचा संतप्त प्रकार आज उघडकीस आला आहे.

उमाळी येथील वासुदेव रामभाऊ उंबरकर यांचं वयाच्या 82 व्या वर्षी प्रदीर्घ आजाराने निधन झालं.

अंत्यविधीसाठी उमाळी गावाच्या वेशीतून तिरडीवरून नेताना चिखलातून आणि गुडघाभर साचलेल्या पाण्यातून चपला काढून एका खांद्यावर तिरडी आणि एक हातात चप्पल घेऊन जावं लागलं.

मृतदेहाचा अंत्यविधी उघड्यावरच होत असल्याने अचानक पाऊस आल्यास समस्या निर्माण होते.

पावसाळ्यात मृतदेह अर्धवट जळाल्यास हिंस्र पशूंकडून अवहेलना होत असल्याचंही म्हटलं जातंय. यामुळे लोकप्रतिनिधींविरोधात नाराजी आहे.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *