Jaimaharashtra news

देशात ऑक्सिजनअभावी एकाही कोरोनामृत्यूची नोंद नाही- केंद्र सरकार

देशातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये ऑक्सिजनच्या अभावी कोणाचाही मृत्यू झाला नाही असा अहवाल राज्यांनी आणि केंद्र शासित प्रदेशांनी दिला असल्याचं केंद्र सरकारने संसदेत जाहीर केलं.

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेदरम्यान राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे मृत्यूच्या कोणत्याही घटनेची नोंद केली गेली नाही,असे केंद्र सरकारने मंगळवारी राज्यसभेत सांगितले. पहिल्या लाटेत मेडिकल ऑक्सिजनची मागणी ३,०९५ मेट्रिक टन एवढी वाढली. त्यानंतर दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनची मागणी ९,००० मेट्रिक टन पर्यंत पोहोचली. त्यामुळे केंद्राने राज्यांमध्ये समान वितरणाची सोय करावी लागली असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी राज्यसभेत सांगितले.

दुसर्‍या लाटेत ऑक्सिजनच्या तीव्र कमतरतेमुळे रस्त्यावर आणि रुग्णालयात मोठ्या प्रमाणात कोविड -१९ रूग्णांचा मृत्यू झाला का, या प्रश्नाच्या उत्तरावर आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी या संदर्भात लेखी उत्तर दिले आहे. सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश नियमितपणे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला माहिती देतात. त्यामुळे राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांपासून स्वतंत्रपणे ऑक्सिजन नसल्यामुळे मृत्यूची कोणतीही आकडेवारी आलेली नाही.

Exit mobile version