Mon. Dec 6th, 2021

‘कर्मचाऱ्यांच्या मागणीबाबत अद्याप निर्णय नाही’ – अनिल परब

  एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा काढण्यासाठी राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात बैठक पार पडली. या बैठकीनंतर अद्याप एसटी कर्मचाऱ्यांच्या मागणीसंबंधी अद्याप कोणताही ठोस निर्णय झाला नसल्याचे अनिल परब यांनी सांगितले आहे.

  एसटी संपाबाबत शरद पवार यांच्या मध्यस्थीला सुरुवात झाली असून एसटी संपाचा वाद मिटविण्यासाठी अनिल परब यांची शरद पवारांसोबत चर्चा पार पडली. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत शरद पवारांनी माहिती घेतली असल्याचे अनिल परब यांनी सांगितले आहे. तसेच कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर कोणते पर्याय असू शकतात तसेच कर्मचारी आणि प्रवासी या दोघांचेही समाधान होणे आवश्यक असल्याचे अनिल परबांनी सांगितले आहे. तसेच एसटी उत्पन्न वाढविण्याच्या उपयांवरही बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली. तसेच कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत पुन्हा एकदा शरद पवार यांची भेट घेणार असल्याचे अनिल परब यांनी सांगितले आहे.

  एसटी महामंडळ राज्यात विलिनीकरण्याच्या मागणीसाठी राज्यात एसटी कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार उपसले आहे. तसेच उच्च न्यायालयाने आदेश काढल्यानंतरही एसटी कर्मचाऱ्यांच्या संप सुरूच आहे. तसेच यासाठी राज्यसरकारने समिती स्थापन केली आहे. या समितीचा निर्णय सरकारला मान्य असल्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी स्पष्ट केले. मात्र मागणी पूर्ण होत नाही तोवर कर्मचारी संपाच्या भूमिकेवर ठाम आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *