Thu. Dec 2nd, 2021

‘महाविदयालय सुरू करण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय नाही’

कोरोनाकाळात गेल्या दोन वर्षांपासून प्रत्यक्ष शिक्षण बंद आहे. विद्यार्थी ऑनलाईन शिक्षण घेत आहेत. कोविडच्या काळात बंद असलेली महाविद्यालय लवकरच पुन्हा सुरु होणार. राज्यातील जिल्हाधिकारी यांच्यासोबत चर्चा करुन तेथील कोविड ची परिस्थिती लक्षात घेऊन त्या त्या भागातील महाविद्यालय सुरु करू असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले आहे .सध्याची कोविड ची परीस्थिति पाहता राज्यातील महाविद्यालय सुरु करण्यासंदर्भात कोणताही निर्णय झाला नाही.

“महाविद्यालये पुन्हा सुरू करणे म्हणजे विद्यार्थ्यांचे मोठे गट एकत्र आणणे आणि जर तसे झाले तर तिसरी लहर अपरिहार्य आहे. तिसरी लहर आली तर विद्यार्थ्यांना त्रास होऊ शकतो, त्यांचे पालक आणि इतरांनाही त्रास होईल,” असे उदय सामंत यांनी सांगितले आहेत . महाराष्ट्रातील सर्व जिल्हाधिकारी यांच्या सोबत चर्चा करुन तेथील कोविडची परिस्थिती लक्षात घेऊन विद्यार्थ्याना महविद्यालयात आल्यावर कोविड होणार नाही विद्यर्थ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याचा पूर्ण अभ्यास जिल्हाधिकारी करतील आणि तसा अहवाल पाठवतील त्यांनातर महाविद्यालय सुरु करण्याचा निर्णय होईल परंतु सध्याची कोविड ची स्थिती पाहता महाविद्यालय सुरु करण्याच्या मनस्थितिमध्ये उच्च व तंत्र शिक्षण विभाग नाही असे वक्तव्य राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी अमरावती मध्ये पत्रकारांशी बोलताना केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *