अलिबागमध्ये पर्यटकांना ‘नो एन्ट्री’

अलिबाग: वर्षा सहलीसाठी बाहेर पडलेल्या पर्यटकांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. लोणावळा किंवा महाबळेश्वर इथं प्रवेश बंद आहे किंवा पर्यटन खुलं झालं नाही म्हणून तुम्ही अलिबाग किंवा मुरुडला यायचा विचार करत असाल तर ती तुमची चूक ठरू शकते. अलिबागला येणाऱ्या पर्यटकांचीही नाकाबंदी करण्यात आली आहे. पेझारी चेकपोस्टवर पर्यटकांची वाहने अडवून त्यांना परत पाठवले जात आहे. पोलिसांकडून विशेष मोहीम राबवली जात आहे. त्यामुळे पर्यटकांचा पुरता हिरमोड झाला आहे. शिवाय स्थानिक मुंबईकरांची देखील अँटीजन टेस्ट करूनच त्यांना पुढे जाऊ दिले जात आहे.