Tue. Jun 28th, 2022

खुल्ताबादेत औरंगजेबाच्या कबरीवर प्रवेशबंदी

एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवेसी यांनी औरंगजेबाच्या कबरीला भेट दिल्यापासून राजकीय वातावरण चांगलच तापलेलं दिसत आहे. भारतीय जनता पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि खासदार-आमदार राणा दाम्पत्याने एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवेसी यांनी औरंगजेबाच्या कबरीवर फुले अर्पण केल्याच्या गोष्टीवर टीका केली आहे. त्यामुळे राजकारणात तणावाचं वातवरण निर्माण झालं होतं. तेथील स्थानिक नागरिकांनी दोन दिवसांपूर्वी कबर बंद करण्याची मागणी केली होती. कबरीला काही अज्ञातांकडून धोका असल्याचं म्हटलं जात होतं परंतू पोलिसांनी त्यात हस्तक्षेप केला होता. तेव्हा पासून परिसरात तणावपूर्ण शांतात पसरली आहे. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने पुरातत्व विभागाने खुल्ताबादेत औरंगजेबाच्या कबरीवर प्रवेशबंदी लावण्यात आली आहे. या कबरीवर आता पर्यटकांना औरंगजेबाची कबर पहायला मनाई केली आहे.

खुल्ताबादेत असलेल्या औरंगजेबाच्या कबरीवर ५ दिवस प्रवेशबंदी करण्यात आली आहे. ही बंदी सुरक्षेच्या कारणास्तव असल्याचे सांगण्यात आलेले आहे. ही कबर उखडून टाकावी अशी मागणी जोर धरू लागल्याने खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेतल्याचे समजत आहे. क्रूर इस्लामी शासक औरंगजेबाच्या कबरीवर या प्रवेशबंदी दरम्यान कुणालाही जाता येणार नाही. तर मुख्य प्रवेश द्वारावर दोन सुरक्षा रक्षकांना भारतीय पूरातत्व विभागाच्या वतीने तैनात करण्यात आले आहेत. आगामी काळात परिस्थिती पाहता आणखी पाच दिवस बंद ठेवली जाऊ शकते असे ही या पत्रात नमूद करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.