मुंबईत रात्रीच्या संचारबंदीला मुदत वाढ नाही
मुंबईतील नाईट कर्फ्यू संपला…

मुंबईतील नाईट कर्फ्यू न वाढवण्याचा निर्णय आज घेतला मुंबई पोलिसांनी आहे. मुंबईतील नाईट कर्फ्यूची मुदत आता संपलेली आहे. सरकारकडून आज कुठलीही सूचना न आल्यानं हा निर्णय घेण्यात आला आहे. शिवाय यापुर्वी रात्री ११ वाजेपासून सकाळी ६ वाजेपर्यंत मुंबईत नाईट कर्फ्यू होता. या नाईट कर्फ्यूची ५ जानेवारीपर्यंत मुदत होती. त्यामुळे आता मुंबईत नाईट कर्फ्यू नसणार आहे.
ख्रिसमस व नववर्ष सुरुवातीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून महापालिका क्षेत्रात नाईट कर्फ्यूची निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे एकप्रकारे आजपासून मुंबईतील नाईट कर्फ्यू संपलेला आहे. महाराष्ट्रात उद्यापासून रात्रीची संचारबंदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय असून ब्रिटनमधील नव्या कोरोना व्हायरसचा प्रकार आढळून आल्यानं महाराष्ट्रात अधिक दक्षता घेतली जात आहे. २१ डिसेंबर रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खबरदारीच्या उपाययोजनांसाठी बैठक घेतली होती. या बैठकीत महाराष्ट्रातील महानगरपालिका क्षेत्रात रात्रीची संचारबंदी(नाईट कर्फ्यू) लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.