Tue. Jul 27th, 2021

‘नो फर्स्ट युज’ या अण्वस्त्रांच्या वापरासंबंधीच्या धोरणात परिस्थितीनुसार बदल होणार – राजनाथ सिंह

अण्वस्त्रांचा वापर पहिले न करण्याच्या धोरणात बदलाचे संकेत सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दिलेत. भविष्यात अण्वस्त्र वापरण्याचा निर्णय तेव्हाच्या परिस्थितीच्या आधारे घेतला जाईल अस त्यांनी स्पष्ट केलय. राजनाथ सिंह यांनी राजस्थानच्या पोखरण इथ अटल बिहारी वाजपेयी यांना श्रध्दांजली दिली, त्यावेळी त्यांनी हे विधान केलं आहे.

काय म्हणाले राजनाथ सिंह?

इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वात पहिल्यांदा भारतात 1974 मध्ये अणूचाचणी केली. त्यानंतर 1998 मध्ये अटलबिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात पोखरण इथं भारताने दुसरी अणूचाचणी केली. भारत अण्वस्त्रांचा वापर प्रथम करणार नसल्याची भारताच आतापर्यंतच अधिकृत धोरण होत, मात्र अलिकडे पाकिस्तानसोबत तणावाच्या वातावरणात संरक्षण मंत्र्याचं हे विधान महत्वाचं आहे. अप्रत्यक्षपणे भारत आता आक्रमक धोरण स्विकारणार असल्याचे संकेत केंद्र सरकारने दिले आहेत.

दरम्यान अण्वस्त्रांचा वापर पहिले न करण्याच्या धोरणात बदलाचे संकेत सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दिलेत. भविष्यात अण्वस्त्र वापरण्याचा निर्णय तेव्हाच्या परिस्थितीच्या आधारे घेतला जाईल अस त्यांनी स्पष्ट केलय. राजनाथ सिंह यांनी राजस्थानच्या पोखरण इथ अटल बिहारी वाजपेयी यांना श्रध्दांजली दिली, त्यावेळी त्यांनी हे विधान केलं आहे.

अणूराष्ट्राचा दर्जा प्राप्त करणारा भारत हा एक जबाबदार देश आहे. आणि ही प्रत्य़ेक भारतीयासाठी अभिमानाची गोष्ट आहे. यासाठी अटलजींनी घेतलेल्या मेहनतीसाठी देश नेहमीच त्यांचा ऋणी राहील. असं ही राजनाथ सिंह म्हणाले आहेत. , “आजपर्यंत आपले अण्वस्त्र धोरण हे ‘नो फर्स्ट युज’असं होतं. मात्र, भविष्यात काय घडेल हे त्यावेळी असणाऱ्या परिस्थितीवर अवलंबून असेल” असे ट्विट राजनाथ यांनी केले आहे.

पोखरणला ही अणूचाचणी झाल्यानंतर ‘नो फर्स्ट युज’ हे धोरण ठरवण्यात आलं होत. परंतु परिस्थीतीनुसार या धोरणात बदल होवू शकतो असे राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *