Tue. Sep 28th, 2021

‘राहुल गांधी पंतप्रधान होत नाहीत, तोपर्यंत उधारी बंद!’

लोकसभा निवडणुकीनंतर नेमकं कोण पंतप्रधान होणार हे जरी अजून गुलदस्त्यात असलं, तरी येणाऱ्या निकालाबद्दल लोकांमध्ये चांगलीच उत्कंठा आहे. मात्र माढ्यातील एका सलून व्यावसायिकाने या निवडणुकीच्या निकालापूर्वीच एक नवी क्लृप्ती शोधून आपला व्यवसाय वाचवला आहे. उधारीला कंटाळलेल्या माढ्यातील सलून व्यावसायिकाने दुकानात राहुल गांधींचा फोटो लावून ‘राहुल गांधी पंतप्रधान होत नाहीत तोपर्यंत उधारी बंद’ असा बोर्डच लावला आहे.

राहुल गांधी आणि उधार!

दुकानामध्ये ‘आज रोख उद्या उधार’ अशा छापाचे बोर्ड व्यापाऱ्यांनी लावल्याचं आपण पाहिलं असेल.

मात्र माढा शहरातील एका सलून व्यावसायिकाने उधारीला बगल देण्यासाठी चक्क राहुल गांधींनाच मध्ये आणलं आहे.

सचिन बाळासाहेब शेलार असं त्या नामी शक्कल लढवलेल्या सलून व्यावसायिकाचे नाव आहे.

शेलार यांनी दुकानातील काचेवर राहुल गांधी यांचा फोटो लावला आहे.

‘जोपर्यंत राहुल गांधी पंतप्रधान होत नाहीत, तोपर्यंत उधारी बंद’ असा फलकही त्यासोबत लिहला आहे.

उधारीच्या कटकटीला कंटाळून राहुल गांधी अस्त्र वापरल्याने त्यांची आणि त्यांच्या दुकानांची चांगलीच चर्चा होतेय.

या बरोबरच शेलार यांनी आपलं देशप्रेमही आपल्या कामातून व्यक्त केलंय.

भारतीय सैन्य दलातील आजी माजी सैनिकांना ते आपल्या सलूनमध्ये पन्नास टक्के सवलत देतात.

एकूणच सचिन शेलार यांचं सलून चांगलंच चर्चेत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *