शिवभोजन थाळीसाठी आधार कार्डाची गरज नाही – छगन भुजबळ

बहुप्रतिक्षित शिवभोजन योजनेची सुरुवात राज्यात २६ जानेवारीसून होत आहे. या शिवभोजन थाळीसाठी आधार कार्डाची गरज नसणार आहे. याबाबतची माहिती अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.
शिवभोजन थाळीसाठी आधार कार्ड सक्तीचे असल्याचे वृत्त ही निव्वळ अफवा असल्याचं भुजबळ म्हणाले.
या शिवभोजन थाळीचा गोरगरिब जनतेला फायदा व्हावा. तसेच या योजनेत कुठेही गैरफायदा घेतला जाऊ नये, यासाठी आम्ही काळजी घेणार असल्याचेही भुजबळ म्हणाले.
विधानसभा निवडणुकीच्या वेळेस शिवसेनेने शिवभोजन थाळी सुरु करणार असल्याचे आश्वासन दिले होते.
राज्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी शिवभोजन केंद्र उभारण्यात येणार आहेत. दुपारी १२ ते २ या २ तासांच्या कालावधीत हे शिवभोजन केंद्र सुरु असणार आहे.
या योजनेअंतर्गत मुंबई शहराला दिवसाला 1950 थाळ्या दिल्या जाणार आहेत.
अशी असेल शिवभोजन थाळी
थाळीत 2 पोळ्या 1 वाटी भात डाळ आणि भाजी असणार आहे.
30 ग्रॅमच्या दोन चपात्या.
100 ग्रॅमची एक वाटी भाजी.
150 ग्रॅमचा एक मूद भात वाटी.
100 ग्रॅमचे एक वाटी वरण.